शेती सेवा शेतकरी यंत्रणा
थोडक्यात माहीती
शेती सेवा शेतकरी यंत्रणा अराजकीय व सामाजीक तसेच सेवा तत्वावर मागील दहा वर्षे पासुन शेतीकरी व शेती सेवा, शेती माहीती तंत्रज्ञान, शेती सल्ला सेवा, ई विषयावर राज्यातील शेतकरी बांधवाकरीता काम करत आहे. सन 2000 पासुन गरजेनुसार शेतकरी बांधवांनर https://www.ShetiSeva.Org या वेबसाईटवर शेती उत्पादने व संमंधीत online विक्री करीता e-commerce सुवीधा उपलब्ध करुन देण्यात आली व ती आजही सुरु आहे.
या सोबतच शेती व शेतकरी विकास साठी सातत्याने गरजेप्रमाणे नवीन सुचना, विकास मॉडेल राज्य शासनास सादर करण्यासाठी तसेच विविध शेती व शेतकरी सेवा संमंधील सातत्त्याने पाठपुरवा करण्याच्या हेतुने राज्यभरातील शेती सेवा शेतकरी संघटन यंत्रणा व्दारे काम सुरु आहे.
शेती संघटन – शेती तंत्रज्ञान व सल्ला सेवा – शेती विपनण – शेती योजना या महत्वाच्या उदेशातुन शेती सेवा शेतकरी यंत्रणा राज्यात शासनास मदत करणारी समांतर यंत्रणा म्हणुन काम करीत आहे.
शेती सेवा शेतकरी यंत्रणेचे संमन्वयक कोणत्या तत्वावर आहेत?
शेती सेवा शेतकरी यंत्रणेचे संमन्वयक सेवा त्तवावर म्हणजेच समन्वयकास कोणत्याही प्रकारचे मानधन शेती सेवा यंत्रणेमार्फत दिल्या जात नाही व भवीष्यातही दिले जाणार नाही.
शेती व शेती सेवा फक्त या सेवा भावनेतुन काम करणारे समन्वयक नियुक्त असतील.
शेती संघटन, शेती तंत्रज्ञान, शेती संल्ला सेवा, शेती विपणन, शेती योजना या माहीतीच्या आधारावर व यंत्रणेच्या राज्यव्यापी टिम आधावर कायदयाच्या कक्षेत राहुन व सकारात्मक भावणेतुन समन्वयकास लाभ होत असेत तर त्याकरीता शेती सेवा यंत्रणेचे समर्थन असेल.
शेती व शेती सेवा यातुन अभ्यासपुर्ण, तांत्रीक व सामाजीक अभ्यास असणारे, शासकीय योजनांचा अभ्यास असणारे तसेच शेती व शेतकरी यांच्या करीता भवीष्यात आवश्यकता असणारे विषय तज्ञ सकारात्मक नेतृत्व उभे राहील.
कोणत्या उदेशातुन शेती सेवा शेतीकरी समन्वयक होवु शकता ?
आपण स्वत: च्या अथवा आपल्या क्षेत्रातील शेतकरी बांधवांना शेती योजना, शेती संघटन, शेती तंत्रज्ञान सल्ला सेवा, शेती व्यापार व ई. विषयावर लाभ देणे करीता.
आपल्या स्वत: च्या अथवा गावच्या, तालुका अथवा जिल्हयाच्या शेती व शेतकरी अडचणी, शंका, तंत्रज्ञान, ई विषयावर प्रत्येक जिल्हयातील व राज्यपातळीवर यंत्रणेचा उपयोग घेणे व ईतरानांही आपली सेवा देणे.
शेतकरी व शेती सेवा आणी सर्वांगीन विकास करणे.
शासन व शेतकरी यातील दुवा म्हणुन काम करणे. शेती सेवा शेतकरी यंत्रणा ही राज्य पातळीवरील शासनास समांतर अशी शेती व शेतकरी बांधवांना मदत करणारी सेवा तत्वावर यंत्रणा आहे.
शेती सेवा शेतकरी यंत्रणेच्या विषेश तज्ञ व राज्यभरातील समन्वयक, शेतकरी व ईतर सदस्य यांच्या माध्यमातुन सातत्याने खालील व ईतर शेती व शेतकरी अडचणी उपाययोजना शोधने व त्याव्दारे शासनास सुचना व मार्गदर्शन करणे.
1.शेतकरी आत्महत्या थांबवने व ईतर संवेदनशील विषयावर सातत्याने उपाय शोधने व शेती सेवा शेतकरी यंत्रणा, राज्य व केंद्र शासनाच्या मदतीने विविध मार्गाने काम करणे.
2.शेतकरी कंल्यानकारी व नावींन्यपुर्ण योजना करीता सातत्याने सुचना व मार्गदर्शन शासनास करणे.
3.शेतकरी बांधवांच्या मुलांच्या शिक्षण व रोजगार.
4.शेतकरी व शेती सेवा, विकास, अडचणी, योजना बाबतीत संशोधन आणी विकास करणे.
5.शेती प्रक्रीया व ईतर उदयोग, शेती माल खरेदी विक्री यातुन उपन्न वाढवणे.
- शेती सेवा शेतकरी यंत्रणेचे कोणत्या स्तरावर संमन्वयक आहेतखालील प्रमाणे राज्यापासुन ते गाव स्तरावर समन्वयक आहेत.
1. राज्य
2. विभाग
3. जिल्हा
4. तालुका
5. गण
6. गाव
- शेती सेवा यंत्रणेचे समन्वयक कोण कोणत्या विषयात आहेत
1. शेतकरी संघटन
2. शेती तज्ञ
3. शेती शासकीय कार्यालय समन्वयक
4. सोशल मेडीया समन्वयक
5. पुरस्कार प्राप्त शेतकरी समन्वयक
6. शेती पत्रकारीता समन्वयक
7. शेती तंत्रज्ञान व सल्ला सेवा समन्वयक
8. शेती -कृषि पदवी व पदवीकाधारक समन्व्यक
9. शेती व्यापार विपनण समन्वयक
10. शेती योजना समन्वयक
11. सेवाभावी संस्था समन्वयक
12. शेती कायदा समन्वयक
13. सरपंच समन्वयक
14. ग्राम रोजगार सेवक समन्व्यक
15. शासकीय कर्मचारी प्रतीनीधी
- शेती सेवा यंत्रणेचे समन्वयक कोण होवु शकते ?
1. शेतकरी
2. सरपंच अथवा ग्रामपंचात सदस्य
3. पुरस्कार प्राप्त शेतकरी
4. शासकीय कर्मचारी
5. विदयापिठ शास्त्रज्ञ
6. ग्राम रोजगार सेवक
7. कृषि पदवीधर
8. कृषि पदवीकाधारक
9. वकील
10. सेवाभावी संस्था प्रतीनीधी
11. शेतकरी बचत गट समन्वयक
- राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर वरीलप्रमाणे तसेच गरजेप्रमाणे सारखीच समन्वयक यंत्रणा असेल.
गाव स्तरावर यंत्रणा
सरपंच -पदसिध्द
शेतकरी मुख्य समन्वयक
शेतकरी बचत गट समन्वयक
शेतकरी महीला समन्वयक
ग्राम रोजगार सेवक -पदसिध्द
शेती सेवा शेतकरी यंत्रणा राज्य विभाग व जिल्हा पातळीवर कशा प्रकारे काम करते
- शेतकरी संघटन – शेती सेवा शेतकरी संघटन समन्वयक
जिल्हयातील शेतकरी व सर्व यंत्रणा संघटन व संमंधीत सेवा कार्य हे प्रामुख्याने जवाबदारीचे असेल.
सर्व विषयातील जिल्हा समन्वयक यांना कार्यतत्पर ठेवणे व त्यांच्या अडचणी सोडवणे.
गाव पातळीपासुन ते जिल्हा पातळीपर्यंत सर्व समन्वयकांशी संपर्कात रहाणे.
राज्य पातळीवरील निर्णयाची अंमलबजावनी करणे.
जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवांच्या व शेती संमंधीत अडचणी बाबतीत पत्र व्यवहार करणे.
शेती सेवा शेतकरी यंत्रणेतील सर्व प्रकारचे संघटक यांना कार्यतत्पर न रहाणे अथवा मार्गदर्शक सुचनेच्या कक्षे बाहेर काम करत असल्यास त्यांची नियुक्ती रदद करणे बाबतीत राज्य स्तरावरील संघटक संमन्वयक यांना कळवने.
राज्य स्तरावरील विविध माहीती अहवाल वेळोवेळी पाठवणे.
- शेती तज्ञ – शेतकरी तज्ञ समन्व्यक
जिल्हा शेती तज्ञ समन्वयक हे जिल्हयातील सर्व प्रगतीशील शेतकरी, विविध विषयातील तज्ञ व अनुभवी शेतकरी यांची सुची तयार करुन अदयावत ठेवतील.
विविध पिके, शेती पुरक व्यवसाय, प्रक्रीया, शेती तंत्रज्ञान ई विषयातील तज्ञ व अनुभवी शेतकरी यादी तयार करणे व अदयावत ठेवणे.
तज्ञ शेतकरी यांचे सातत्याने माहीतीचे दस्तावेज तयार करुन सोशल मेडीया समन्वयक यांना कळवणे व ते गावातील शेतकरी बाधवांपर्यंत पोहचवणे.
मेळावे व सोशल मेडीयावर प्रत्यक्ष मार्गदर्शन करणारे तज्ञ शेतकरी बांधवांची यादी अदयावत ठेवणे.
जिल्यातील शेतकरी बांधवांना वेळोवेळी लागणारे सल्ला सेवा, प्रशीक्षण ई बाबतीत संमंधीतल माहीती अथवा शेतकरी तज्ञ यांचा संपर्क पोहचणे.
कृषि विदयापिठ, कृषि विभाग, कृषि विज्ञान केंद्र व विविध अधीकारी यांच्या संपर्कात राहुन अदयावत तंत्रज्ञान जिल्हयात यंत्रणे मार्फत सातत्याने पोहचवणे.
- जिल्हा शेती प्रशासन समन्वयक- शासकीय कार्यालय समन्वयक
शेती व प्रशासन यांच्या मंध्ये दुवा म्हणुन काम करणे.
शासनास विविध कामकाज करतांना येणाऱ्या अडचणी सोडवणे.
शेती योजना व ईतर कामकाज बाबतीत काही वाद झाल्यास त्यात समन्वय साधुन तोडगा काढणे.
थोडक्यात प्रशासनाची कार्यक्षमता वाढवुन जास्तीत जास्त गावामंध्ये शेतकरी बांधवांना मदत करणे.
- सोशल मेडीया समन्वयक –
जिल्हयातील सर्व शेती सेवा शेतकरी यंत्रणा कामकाज व सर्व विषयातील समन्वयक याचे कार्य यांना सोशल मेडीयावर प्रचार व प्रसीध्दी देणे.
सर्व समन्वय यांना वेळोवेळी सोशल मेडीया संमंधी लागणारे तांत्रीक माहीती देणे व संमंधीत मदत करणे.
शेती सेवा शेतकरी यंत्रणा जिल्हापातळीवर सर्व समन्वय व सदस्य यांची online नोंदणी करीता सर्वोतोपरी मदत करणे.
जिल्हयातील फेजबुक पेज, वाटस अप व टेलीग्राम गृप अदयावत ठेवणे व सातत्याने राज्य पातळीवरील कळवलेली माहीती तसेच जिल्हा संघटक यांनी कळवलेली माहीती प्रसारीत करणे.
- पुरस्कार प्राप्त शेतकरी समन्वयक
जिल्हयातील विविध शेती क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त शेतीकरी यांची सुची तयार करुन सातत्याने संपर्कात रहाणे.
समंधीतल पुरस्कार प्राप्त शेतकरी बांधवांनकडुन मिळालेले शेती तंत्रज्ञान सातत्याने प्रसारीत करणे.
पुरस्कार प्राप्त शेतकरी बांधवांचा शेती व शेतकरी विकास करणे बाबतच्या सुचना त्यांच्या सातत्याने संपर्कात राहुन राज्य पातळीवर कळवणे.
मेळावे व सोशल मेडीयावर प्रत्यक्ष मार्गदर्शन करणारे पुरस्कार प्राप्त शेतकरी बांधवांची यादी अदयावत ठेवणे.
जिल्हयातील शेती तंत्रज्ञान व शेतकरी सेवा क्षेत्राात महत्वाचे योगदान देणारे शेतकरी यांना सातत्याने शोधत राहुन माहीती घेणे व त्यांना शेती सेवा शेतकरी यंत्रणेचे विविध पुरस्कारासाठी नामांकन तयार करुन पाठवणे. (शेती दुत, शेतकरी योध्दा, स्टार शेतकरी, शेती रत्न, शेती भुषन, शेती सेवा जिवन गौरव )
शेती दुत – परीसरातील शेतकरी बाधवांना सातत्याने विविध विषयातीन माहीती, सल्ला सेवा, योजना कटाक्षाने सेवाभवाने पोहचवणारा शेतकरी दुत.
उत्कृष्ठ भुमी सेवा – पाणी, जमीन व वातावरण सुधारणेसाठी सातत्याने प्रयत्न करणे, जल व मृद संधारणातील उत्कृष्ठ कार्य, वृक्षारोपण ई कार्य.
शेती सेवा धनलक्ष्मी – शेती, शेती उदयोग, प्रक्रीया उदयोग, ई माध्यमातुन कुटुंबास आर्थीक मजबुती देण्यारी महीला, माता, भगीणीसाठी पुरस्कार.
शेती सेवा गो-धन संवर्धन – आजच्या काळातळी जास्तीत जास्त गोधनाचा साभाळ करणे, प्रामुख्याने शेत खताचा वापर शेतीसाठी करणे.
शेतकरी योध्दा – शेतकरी बाधवांच्या विविध समस्या सोडण्यासाठी, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सातत्याने कार्य तत्पर असा युवा शेतकरी.
शेती सेवा स्टार संशोधक शेतकरी – नवीन शेती तंत्रज्ञान विकसीत करणे, नवीन वानाचा शोध लावणे ई. बाबतीत उल्लेखनीय कार्य.
शेती सेवा स्टार उत्पादक शेतकरी- विविध पिकातील उच्चतम उत्पादन काढणे, तंत्रज्ञानाचा अचुक वापर करणे ई बाबतीत उल्लेखनीय कार्य.
शेती सेवा स्टार उदयोजक – शेती उत्पादने प्रक्रीया अंतर्गत यशस्वी उदयोग उभारणे व कार्यरत ठेवणे. शेती उदयोगातुन रोजगार वाढवणे.
शेती सेवा रत्न- शेती तंत्रज्ञान विकसीत करणे, उच्चतम उत्पादन काढणे, तंत्रज्ञानाचा प्रसार प्रचार करणे, शेतकरी बांधवांचे उत्पादन अथवा नफा वाढवण्यासाठी हातभार लावणे ई बाबतीत उल्लेखनीय कार्य.
शेती सेवा भुषण- क्षेत्रातील काही गावामधील शेतकरी बाधवांना शेती बाबतीत सातत्याने सकारात्कम ठेवणे, उत्पादन वाढसाठी मदत करणे, शेती तंत्रज्ञान, सल्ला सेवा सातत्याने कार्य करणे.
शेती सेवा जिवन गौरव पुरस्कार – संपुर्ण जिवन शेती व शेतकरी सेवेत समर्पीत करणे, जिवनामधील मुख्य ध्येय शेती, शेतकरी व गावाचा विकास.
शेती सेवा उत्कृष्ठ सरपंच – सेवा कालावधीमध्ये गावातील विकासासाठी केलेले उल्लेखणीय कार्य करीता.
शेती सेवा गतीमान सरपंच- सेवा कालावधीमंध्ये कमी अवधीमंध्ये जास्तीत जास्त कामकाज पुर्णत्वास नेणे.
शेती सेवा तत्पर सरपंच- सेवा कालावधीमंध्ये गावकऱ्यांसाठी जास्तीत जास्त वेळ उपलब्ध असणारे उल्लेखणीय तत्परता.
शेती सेवा उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कार – पदावर असतांना विविध योजनेत अथवा एका योजनेत अतीशय उल्लेखनीय कामगीरी करीता.
शेती सेवा उत्कृष्ठ अधीकारी पुरस्कार – पदावर असतांना क्षेत्रामंध्ये उल्लेखणीय कामगीरी करीता.
- जिल्हा शेती पत्रकारीता समन्वयक
शेती सेवा शेतकरी यंत्रणेतील विविध शेती व शेतकरी बाबतीती महत्वाच्या बातम्या जिल्हयातील वर्तमान पत्रके यांना सातत्याने पोहचवणे व समन्वय साधुन त्या सातत्याने प्रसारीत करणे.
शेती तंत्रज्ञान, शेतकरी यशोगाथा, विशेष संदेश, शेती व शेतकरी मधीज अडचणी, शेतीतील धोके, फायदे यांबाबतीत सातत्याने विविध वृतपत्रातुन प्रचार व प्रसार करणे.
- शेती तंत्रज्ञान व सल्ला सेवा समन्वयक
शेती तज्ञ, पुरस्कार प्राप्त शेतकरी समन्वयक, व ईतर समंधीतांच्या संपर्कात राहुन सातत्त्याने शेती नवनवीन तंत्रज्ञान व सल्ला सेवा बाबतीत माहीती प्रसारीत करणे.
शेतकरी बांधव यांना थेट, मेळावे, सोशल मेडीया ई सर्व प्रकारच्या माधमातुन प्रत्यक्षपणे कृषि तंत्रज्ञान शेती सल्ला सेवा वेळोवेळी प्रसारीत करणे.
- शेती -कृषि पदवी व पदवीकाधारक समन्व्यक
कृषि पदवीधर अथवा पदवीकाधारकांची सुची तयार करणे.
पदवीधर व पदवीकाधारकांच्या अडचणी सातत्याने सोडवणे.
शिक्षण पुर्ण झाल्यावर त्यांना विविधर रोजगाराच्यां संधी बाबतीत मार्गदर्शन करणे.
शिक्षणासाठी असणाऱ्या शासानाच्या विविध योजना बाबतीत त्यांना सातत्याने मार्गदर्शन करणे.
- शेती व्यापार विपनण समन्वयक
शेती व्यापार, खरेदी विक्री बाबतीती विविध संधी माहीती अदयावत ठेवणे.
शेतकरी बाधवांना विविध खरेदी विक्री करीता राज्य स्तरावर समन्वय साधने.
विविध शेती उत्पादने हमी भावाने विक्री करीता प्रयत्न करणे.
शेती व्यापारी व शेतकरी यांच्यात समन्वय साधने.
one village one marketplace संकल्पाना प्रत्येक गावांना समजावुन सागणे व मार्गदर्शन करणे.
- शेती योजना समन्वयक
शेती व शेतकरी बाबतीत विविध शासकीय योजना बाबतीत माहीती अदयावत ठेवणे.
विविध शासकीय कार्यालयाशी संपर्कात राहुन शेती योजना बाबतीत शेतकरी बाधवांना मार्गदर्शन करणे.
कुशलतेचा वापर करुन कमी चकरामंध्ये, खर्चाची व वेळेची बचत होईल ते पहावे.
योग्य योजना योग्य शेतकरी बाधवानपर्यंत पोहचवीने. तळागाळाचे मेहणती शेतकरी शहरामंध्ये सहसा येत नाहीत अश्याही शेतकरी बाधवांना विचार करणे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांपर्यंत योजना पोहचवणे.
- सेवाभावी संस्था समन्वयक
शेती व ग्रामीण विकास करणारे सेवाभावी संस्था यादी उदयावत ठेवणे.
शेती विकासासाठी सेवाभावी संस्थांना प्रेरीत करणे.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हयातील सेवाभावी संस्थांना प्रेरीत करणे व सातत्याने पाठपुरवा करणे.
शेतकरी आत्महत्या रेाखण्यासाठी काय करता येईल यावर संशोधन करणे.
- शेती कायदा समन्वयक
शेती व शेतकरी बातीत सातत्याने कायदयाचा अभ्यास करणे.
सर्व शेती सेवा शेतकरी समन्वयक यांना सातत्याने कायादया बातीत मार्गदर्यान करणे.
शेती सेवा कायदा समन्वयक हे कमीत कमी एलएलबी असावेत.
- सरपंच समन्वयक
जिहयातील सर्व सरपंच यांच्या सातत्याने संपर्कात रहाणे.
शेती व शेतकरी विकास, शेती योजना, गावाचा विकास आराखडा, अडचणी, उपाय व ईतर सर्व बाततीत सर्व सरपंच यांना सातत्याने मार्गदर्शन करणे.
गावातील विविध अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे व सरपंच यांना मदत करणे.
- ग्राम रोजगार सेवक समन्व्यक
जिल्हयातील सर्व ग्राम रोजगार सेवक यांना विविध बाबतीती सातत्याने मार्गदर्शन करणे.
ग्राम रोजगार सेवकांच्या विविध अडचणी सोडवणे.
लागणारे विविध तांत्रीक मार्गदर्शन करणे.
- शासकीय कर्मचारी प्रतीनीधी
सर्व शासकीय विभागाचा एक प्रतीनीधी शेती सेवा शेतकरी यंत्रणेत असेल त्यांचे प्रतीनीधीत्व करणारा हा समन्व्यक असतील.
शासकीय कर्मचारी यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे.
शासकीय कर्मचारी यांचे विकास कामासाठी मनोबल वाढवणे व सुरक्षीत वातावरण देणे.
शासणाच्या योजना राबवीतांना गरज असेल तीथे शेती सेवा शेतकरी यंत्रणेचे प्रतीनीधींची मदत देणे.
धंन्यवाद
शेती सेवा शेतकरी यंत्रणा
शेती सेवा शेतकरी यंत्रणेत आपले स्वागत आहे.
काही सुचना असल्यास कळवावे
email – ShetiSeva1@Gmail.com
whats app- +918888456301
website – https://www.shetiseva.org
about us – https://www.shetiseva.org/shetiseva