You are currently viewing सोयाबीन :कमी खर्चात चांगले उत्पादन साठी लागणाऱ्या निवीष्ठा:

सोयाबीन :कमी खर्चात चांगले उत्पादन साठी लागणाऱ्या निवीष्ठा:


खालील प्रमाणे निवीष्ठा: 

खालील लागणाऱ्या निवीष्ठा एक एकर साठी दिलेल्या आहेत क्षेत्र कमी जास्त तसल्यास त्या प्रमाणात बदल करावा

1. सोयबीन बीयाने ३० किलो .   घरचेच वापरावे
2.थायरम १३५ ग्रॅम किंवा बावीस्टीन ९० ग्रॅम कोणतेही एक बुरशीनाशक बीज प्रक्रीया करीता.
3. रायझोबीयम ५०० ग्रॅम व PSB ५०० ग्रॅम बीज प्रक्रीया करीता.
4. युरीया 25 किलो 
5.SSP खत 150 किलो
6. फोरेट 10 टक्के 4 किंलो किंवा कार्बोफयुरॉन 3 टक्के 12 किंलो कोणतेही एक. पेरते वेळेस टाकायचे आहे. खोडमाशी, चक्री भुंगा, उंट अळी प्रतीबंधक व फवारनीचा खर्च वाचवन्यासाठी प्रभावी.
7.तननाशक :
पेरणी नंतर व उगवनी पुर्वी पेंडिमीथॅलीन 1 किलो 400 लिटर पाण्यात.
गरज असल्यास
उगवनी नंतर १५ दिवसांनी किंवा तन 2 ते 3 पाणावर असतांना इमॅझीथॅपायर ४०० मीली 240 लीटर पाण्यात वापरावे.
वरील निवीष्ठा कमी खर्चात जास्त उत्पादन करीता नियोजीत केल्या आहेत. बीयाने, फवारणी व निंदन खर्च कमी करुन योग्य खताव्दारे प्रमाणात जास्त उत्पादन उदेश आहे. *सदरील निवीष्ठा एकदाच तयार ठेवा कारण पेरणीवेळेसच व उगवनी नंतर लगेच लागणा-या आहेत. कमीत कमी बाहेर जायचे टाळा काळजी घ्यावी.*
शेतीवर आधारीत माहीती तंत्रज्ञान, शासनाच्या योजना व शेती मालाची खरेदी विक्री बाबतीत सातत्याने शेतकरी बाधवांच्या सेवेत मागील पाच वर्षापासुन.
शेती सेवा
शेती सेवा शेतकरी यंत्रणा.  
“महाराष्ट्रातील प्रत्येक गाव प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत”
वाटस अप 8888456301