हळदीवरील करपा, कंदकुज आणि कंद माशीचे व्यवस्थापन…!

डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे आणि श्री.एम.बी.मांडगे
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी

सध्यपरिस्थितीत हळद वाढीच्या अवस्थेमध्ये आहे बऱ्याच ठिकाणी सततचा रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सध्या हळदीवर करपा, पानावरील ठिपके आणि कंदमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. तरी येणाऱ्या काळात या बुरशीजन्य रोगांचा, कंदकुज तसेच कंदमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी या रोगांचे तसेच कंदमाशीचे खालील प्रमाणे व्यवस्थापन वेळीच करणे अत्यंत गरजेचे आहे.

हळदीवरील करपा, कंदकुज आणि कंद माशीचे व्यवस्थापन…!

डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे आणि श्री.एम.बी.मांडगे
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी

सध्यपरिस्थितीत हळद वाढीच्या अवस्थेमध्ये आहे बऱ्याच ठिकाणी सततचा रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सध्या हळदीवर करपा, पानावरील ठिपके आणि कंदमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. तरी येणाऱ्या काळात या बुरशीजन्य रोगांचा, कंदकुज तसेच कंदमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी या रोगांचे तसेच कंदमाशीचे खालील प्रमाणे व्यवस्थापन वेळीच करणे अत्यंत गरजेचे आहे.

हळदीमधील पानावरील ठिपके आणि करपा व्यवस्थापन

१. करपाजन्य रोगग्रस्त पाने वेळोवेळी जमा करून जाळून नष्ट करावीत आणि शेतात स्वच्छता राखावी.

२. रासायनिक व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे.

प्रादुर्भाव कमी असल्यास
कार्बेडेंझीम ५० टक्के – ४०० ग्रॅम किंवा
मॅन्कोझेब ७५ टक्के -५०० ग्रॅम किंवा
कॉपर ऑक्झीक्लोराइड ५० टक्के – ५०० ग्रॅम यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी.

प्रादुर्भाव जास्त असल्यास
एजोक्सिस्ट्रोबीन १८.२ टक्के + डायफेनोकोनॅझोल ११.४ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) – २०० मिली किंवा
प्रोपीकोनॅझोल २५ टक्के – २०० मिली किंवा
क्लोरथॅलोनील ७५ टक्के – ५०० ग्रॅम
यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी.

हळदीमधील कंदकुज व्यवस्थापन

१. कंदकुज करीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी २ ते २.५ किलो ट्रायकोडर्मा शेणखतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावे.

२. जास्त पावसामुळे शेतात साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा वेळोवेळी निचरा करावा. जेणेकरून कंदकुज होण्यास कारणीभूत असलेल्या बुरशीचा प्रसार कमी करता येईल.

३.कंदकूज झाली असल्यास जमिनीतून
कार्बेडेंझीम ५०% -१ ग्रॅम किंवा
मॅन्कोझेब ७५ टक्के -३ ग्रॅम किंवा
कॉपर ऑक्झीक्लोराइड ५० टक्के -५ ग्रॅम
यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति लिटर पाण्यात मिसळून दरवेळी महिन्यातून एकदा आळवणी करावी.
(आळवणी करताना जमिनीमध्ये वापसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडा ताण द्यावा.)

हळदी वरील कंदमाशी व्यवस्थापन:

१. प्रत्येक १५ दिवसांच्या अंतराने
क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २० मि.ली. किंवा
डायमिथोएट (३०% प्रवाही ) १५ मि.ली. यापैकी एका कीटकनाशकाची प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे झाडावर आलटून पालटून फवारणी करावी व सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळावे.

२. उघडे पडेलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामुळे उघडे पडलेले कंद मातीने वेळोवेळी झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी.

३. पीक तण विरहित ठेवावे.

४. जमिनीतून क्‍लोरपायरीफॉस ५० टक्के ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळवणी करावी. याच पद्धतीने कीटकनाशकाची आळवणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात निश्चित करावी.

५. हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद नष्ट करावेत.

६. तसेच एकरी २-३ पसरट तोंडाची भांडी वापरून प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम घेऊन त्यात १ ते १.५ लिटर पाणी घ्यावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणामध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट गंधाकडे कंदमाशीचे प्रौढ आकर्षित होतात व त्यात पडून मरतात.

(संदर्भ: हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज जि. सांगली)

टीप : हळद पिकावर केंद्रीय कीटकनाशक मंडळातर्फे लेबल क्‍लेम नसल्याने विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क करा
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
परभणी

बाजारातील नावे-
कार्बेडेंझीम ५० टक्के – बाविस्टिन,धानुस्टिन
मॅन्कोझेब ७५ टक्के – डायथेन एम-४५,युथेन एम-४५, मॅकोबन एम-४५
कॉपर ऑक्झीक्लोराइड ५० टक्के – ब्लू कॉपर,ब्लिटॉक्स,धानूकॉप

एजोक्सिस्ट्रोबीन १८.२ टक्के + डायफेनोकोनॅझोल ११.४ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) – ॲमिस्टार टॉप, गोडीवा सुपर,
प्रोपीकोनॅझोल २५ टक्के – टिल्ट, विजेता, प्रोपार, बंपर
क्लोरथॅलोनील ७५ टक्के – कवच, जटायू, इशान, सिनेट