कपाशीवरील आकस्मिक मर रोग: करा उपाययोजना तातडीने..!

  • Post author:
  • Post category:कापुस
  • Post last modified:24 July 2020
  • Reading time:1 mins read

Previous Next सतत सुरु असलेल्या पावसामुळे कपाशीच्या पिकात पाणी  साचल्यामुळे जमिनीतील हवा खेळण्याची क्रिया मंदावून कपाशीच्या झाडाच्या मुळावर आकस्मिक मर ( Para Wilt) या विकृतीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.लक्षणे :   कपाशीचे झाड एका एकी मलूल होणे व पाने पिवळे पडणे , पात्या , फुले गळणे  आणि शेवटी झाड पूर्णपणे सुकून मरणे इत्यादी लक्षणे आढळतातनुकसान : प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटली असता सहज हातात येतात . पाऊस उघडल्यावर सुध्दा या रोगाची मातीत असलेली बीजे अनुकूल वातावरण म्हणजे 30 ते 35 अंश सेल्सियस तापमान मिळताच पिकाच्या मुळ्यांमध्ये प्रवेश करतात व अशी झाडे मरण्यास …

Continue Readingकपाशीवरील आकस्मिक मर रोग: करा उपाययोजना तातडीने..!

गुलाबी बोंडअळीसाठी सुरवातीच्या टप्प्याचे व्यवस्थापन:

काही भागात लवकर लागवड झालेल्या कपाशीला फुले लागली असून त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.. सद्या वातावरण ढगाळ असल्याने व कापसाला पाते, फुले लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे. काही प्रमाणात वरच्या चित्रामंध्ये दाखवल्याप्रमाणे डोमकळया दिसून येत आहेत.व्यवस्थापन:कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात.गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे हेक्‍टरी 05 या प्रमाणात लावावीत़.पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी घ्यावी अथवा प्रादुर्भाव जास्त असल्यास…

Continue Readingगुलाबी बोंडअळीसाठी सुरवातीच्या टप्प्याचे व्यवस्थापन:

कपाशीवरील तुडतुडे, फुलकिडे व मावा नियंत्रण व्यवस्थापन:

मावा : ही कीड १ ते २ मि.मि. लांब असून तिचा रंग पिवळा, हिरवा किंवा काळसर असतो. ही कीड आपले सोंडे सारखे तोंड झाडाच्या व पानाच्या ग्रंथीत खुपसून रस शोषण करते. ही कीड अंगातून मधासाखा चिकट पदार्थ बाहेर फेकते. त्यावर काळी बुरशी तयार होते. या किडीमुळे पाने आकसतात व बारीक होतात. तुडतुडे :ही कीड पाचरीच्या आकाराची ३ ते ४ मि.मि. लांब असून तिचा रंग फिक्कट हिरवा असतो. तुडतुडे पानाच्या खालच्या बाजूस बहुसंख्येने आढळतात. या किडीच्या प्रादुर्भावामुळे कडा पिवळसर व नंतर ताबूस होता.जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने गळून पडतात व झाडांची वाढ…

Continue Readingकपाशीवरील तुडतुडे, फुलकिडे व मावा नियंत्रण व्यवस्थापन:

सोयाबीन पिकावरील : चक्री भुंगा व खोड माशी चे नियंत्रण

खोडमाशीप्रौढ माशी आकराने लहान, चकदार काळया रंगाची असते. फक्त पाय, स्पर्शिका व पंखाच्या शिरा फिकट तपकिरी असतात. मादी माशी पानामध्ये वरच्या बाजूस अंडी घालते. अळी पान पोखरुन शिरेपर्यत पोहचून शिरेतून पानाच्या देठामध्ये शिरते. त्यानंतर खोडामध्ये शिरते. अशाप्रकारे अळी आतील भाग खात जमिनीपर्यंत पोहचते. झाड मोठे झाल्यावर वरुन या किडीचा प्रादुर्भाव जाणवत नाही. फक्त जमिनीजवळ खोडातून प्रौढ माशी निघाल्यास खोडाला छिद्र दिसते. त्यामुळे झाडाच्या वाढीवर विपरित परिणाम होतो. फुले व शेंगा कमी लागतात. खोडमाशीचा प्रादुर्भाव रोपावस्थेत झाल्यावर पूर्ण झाड वाळून जाते, त्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान होते. चक्री भुंगा      या किडीचा प्रौढ…

Continue Readingसोयाबीन पिकावरील : चक्री भुंगा व खोड माशी चे नियंत्रण

सोयाबीन वरील तंबाखुवरील पाने खाणारी अळीचे नियंत्रण :

पतंग:  या किडीचा पतंग मध्यम आकाराचा असून पुढचे पंख तपकिरी रंगाचे असतात व त्यावर फिकट पिवळसर चट्टे व रेषा असतात.  मादी पतंग रात्रीच्या वेळी पानाच्या खालच्या बाजूस शिरेजवळ पुंजक्याने अंडी घालते. या अंडयातून २ ते ३ दिवसांनी अळया बाहेर पडतात. या नवीन लहान अळया सुरवातीस समुहाने राहतात व पानाच्या खालचा भाग खरवडून खातात. या लहान अळया हिरव्या असून त्यांचे डोके काळे असते व शरिराच्या दोन्ही बाजूस काळे ठिपके असतात. पूर्ण वाढलेली अळी गडद तपकिरी किंवा हिरवट पांढ्यया रंगाची असते. मोठया अळया पानावर मोठे छिद्र पाडून खातात. जर प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर असेल तर झाडाची पूर्ण पाने खाल्लेली व फक्त शिराच शिल्लक राहिलेली दिसतात. फुले व शेंगा लागल्यानंतर या अळया ते सुध्दा खातात.·      सोयाबीन वरील तंबाखुवरील पाने खाणारी अळीचे नियंत्रण : मुख्य पिकाभोवती एरंडी आणि सूर्यफुल या सापळा पिकाची एक ओळ लावावी आणि त्यावर तंबाखुवरील पाने खाणारी अळी आणि केसाळ अळी यांची प्रादुर्भावग्रस्त पाने अळयासहीत  नष्ट करावीत. ·      तंबाखुची पाने खाणारी अळी व केसाळ अळया एकाच पानावर पुंजक्याने अंडी घालतात व त्यातून बाहेर पडलेल्या अळया सुरुवातीला एकाच पानावर बहुसंख्य असतात, अशी अंडी व अळीग्रस्त पाने अलगद तोडून किडीसह नष्ट करावीत. ·      तंबाखुची पाने खाणारी अळी या किडीची प्रादुर्भावाची पातळी समजण्याकरीता सर्वेक्षणाकरीता प्रत्येक किडीसाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे शेतात लावावेत. सापळयामध्ये प्रतिदिन ८ ते १० पतंग सतत २ ते ३ दिवस आढळल्यास किडीच्या नियंत्रणाची उपायायोजना करावी. ·      तंबाखूवरील पाने खाणा्यया (स्पोडोप्टेरा) अळीच्या व्यवस्थापनासाठी एस.एल.एन.पी.व्ही. ५०० एल.ई. विषाणू २ मि.लि. प्रति लिटर पाणी किंवा नोमुरिया रिलाई या बुरशीची ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी प्रादुर्भाव आढळून येताच करावी. कीटकनाशक प्रमाण / १० लि. पाणी साध्या फवारणी यंत्राने एनएसकेई (निंबोळी अर्क) किंवा बिव्हेरीया बॅसियाना किंवा ॲझॅडिरॅक्टिन १५०० पीपीएम किंवा नोमुरीया रिलाई किंवा लुफेन्युरॉन ५ टक्के प्रवाही किंवा बॅसिलस थुरिंजिनसिस किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही किंवा ईमामेक्टिन बेन्झोएट ५ एस.जी. किंवा क्लोरपायरीफॅास २० प्रवाही ५ टक्के ४० ग्रॅम २५ मिली ४० ग्रॅम ८ - १२ मिली २० ग्रॅम २० मिली ३.५ ग्रॅम २० मिली

Continue Readingसोयाबीन वरील तंबाखुवरील पाने खाणारी अळीचे नियंत्रण :

सोयबीन तन नियंत्रण:

सोयबीन आंतरमशागत /तन नियंत्रण: पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी व तणे 2 ते 4 पानाच्या अवस्थेत असतांना क्लोरीम्युरॉन इथाईल 25% डब्ल्यु पी 36 गॅम/ हेक्टर किंवाइमेझेथापायर 10% एस एल किंवा क्विजालोफाप इथाईल 5% ई सी10 लि./ हे. ची फवारणी करावी.फवारणी जेट नोझल लावून व ओलावा असेलेल्या जमीनीवरच करावी.तणे फार मोठी झाल्यास परीणाम दिसत नाही 2 ते 4 पानाची अवस्थाएकदम योग्य.शेती सेवा.

Continue Readingसोयबीन तन नियंत्रण: