करडई लागवड संपुर्ण माहीती :
करडई लागवड करडई लागवड प्रस्तावना: रब्बी पिकाची निवड करताना कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन देणा-या आणि अवर्षणाचा ताण सहन करणा-या पिकाचा विचार केल्यास करडईसारखे फायदेशीर पीक दुसरे जाणारे करडई हे प्रमुख पीक आहे. वास्तविक पाहता हे करडई तेल आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. करडईच्या तेलात असंपृक्त आम्लाचे प्रमाण जास्त असल्यामुळे म्हणून हृदयरोग असणा-यांसाठी करडई तेल उत्तम आहे. करडईचे तेल आरोग्यदायी असल्यामुळे तसेच त्याचे क्षेत्रही मर्यादित असल्यामुळे आणि मागणी जास्त असल्यामुळे भाव कमी होणार नाहीत. त्यात वाढ होईल किंवा दर सध्याच्या ठिकाणी स्थिर राहतील. ज्वारी पिकापेक्षा करडई पिकासाठी कमी मजूर…