सोयाबीनवरील प्रमुख किडी
सोयाबीनवरील प्रमुख किडीतंबाखुवरील पाने खाणारी अळीउंटअळीघाटेअळीपाने पोखरणारी अळीचक्री भुंगाखोडमाशीतंबाखुवरील पाने खाणारी अळी या किडीचा पतंग मध्यम आकाराचा असून पुढचे पंख तपकिरी रंगाचे असतात व त्यावर फिकट पिवळसर चट्टे व रेषा असतात. मादी पतंग रात्रीच्या वेळी पानाच्या खालच्या बाजूस शिरेजवळ पुंजक्याने अंडी घालते. लहान अळया सुरवातीस समुहाने राहतात व पानाच्या खालचा भाग खरवडून खातात. मोठया अळ्या ( साधारणपणे तिसया व त्यापुढील अवस्था) विखरुन एकएकटया पाने खातात. पूर्ण वाढलेली अळी गडद तपकिरी किंवा हिरवट पांढया रंगाची असून तिच्या शरिरावर फिकट पाच रेषा असतात. एक रेष पाठीवर मध्यभागी व शरिराच्या दोन्ही बाजूस दोन-दोन…