ओवा लागवड तंत्रज्ञान - लागवड ते काढणी संपुर्ण माहीती

ओवा पिकास मिळणारा बाजार भाव व पीक लागवडीस येणार खर्च या मुख्य दोन कारणामुळे हे पीक आर्थिीक दुष्टया वरदान ठरत आहे.
ओव्याची शेती जगामंध्ये प्रामुख्याने इराण, इराक, अफगाणीस्थान आणी भारतात केली जाते. व भारतामंध्ये जास्त लागवड राजस्थान व गुजरात या प्रांतात केली जाते.
औषधी गुणधर्म
पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा ओवा एक मसाल्याचा पदार्थ आहे.[१] ओवा पाचक असतो, रुचकर असतो, चवीला तिखट, आंबट, कडवट, वीर्याने उष्ण व तीक्ष्ण, तसेच लघू गुणांचा असतो. अग्नीला प्रदीप्त करतो, वात, तसेच कफदोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, गुल्म, प्लीहावृद्धी, तसेच जंत होणे तक्रारींत हितकर असतो. मात्र अतिप्रमाणात सेवन केल्यास पित्त वाढवतो, शुक्रधातूला कमी करतो. पराठे, खारी शंकरपाळे, पुरी इत्यादी मध्ये याचा वापर करतात.
ओव्याच्या बियांचा मसाल्यात उपयोग होते. परंतु मोठया प्रमाणात उपयोग ओषधी गुणधर्म म्हणुन होतो. हा उष्ण गुणांचा असुन जठर विकार, कफ, दमा, लहान मुलांचे पचनाचे विकार, अपचन या विकारावर उपयोग होतो.
हवामान व जमीन :
या पिकास थंड हवामान मानवते. शोखीय वाढ मुख्यत्वेकरुन 15 ते 20 अंश से. तपमानात व 60 ते 65 टक्के आर्द्रतेत उत्तम होते. आणि त्यानंतर वातावरणातील तपमानातील वाढ 25 ते 35 अंश से. पर्यत झाल्यावर कायीक वाढस पोषक असते.
वाळू मिश्रीत जमीन परंतु त्यामंध्ये कर्बाचे प्रमाण 0.4 ते 0.6 टक्के पर्यंत आहे अशी उत्तम निचरा हाोणारी जमीन योग्य असेते. खुप भारी जमीन किंव्या अंत्यंत हलक्या जमीनीत ओव्याचे उत्पन्न अतशिय कमी येते.
जाती:
भारतीय कृषि अनुसंधान संस्था, नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय बियाणे पीक संशोधन केंद्र अजमेर, राजस्थान यांनी पुढील जाती शोधून लागवडीकरीता प्रसारीत केलेल्या आहेत.
1) अेअे-01-19:
ही जात जुनागड कृषि विघापीठ, जुनागड, गुजरात यांनी विकसीत केली असून ही लवकर तयार होणारी जात आहे. कालावधी 150 दिवस असुन हेक्टरी 10 ते 12 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते. तसेच विदर्भातील हवामानात भुरी या रोगाचा प्रादुर्भावापासून कमीत कमी नुकसान करणार आहे. या जातीत ओवा बियाण्यामंध्ये आढळणाऱ्या तेलाचे प्रमाण ३ ते ४ टक्के आहे.
2) लाम सिलेक्शन :
ही जात आंध्रप्रदेशातून निवड पदधतीने शोधून काढण्यात आली आहे. झाडांची सरासरी उंची 60 से.मी. असते. पिकाचा कालावधी 135 ते 145 दिवस एवढा असून साधारणपणे हेक्टरी 8 ते 9 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न देते.
3)आर-ए-1-80:
ही जात बिहार राज्यातून विकसीत करण्यात आली असून बियांचा आकार अतिशय लहान आहे परंतु स्वाद अतिशय मधुर आहे. 170 ते 180 दिवसात काढणीस तयार होते व 10 ते 11 क्विंटल उत्पन्न देते.
पुर्व मशागत :
खरीप हंगामात मुग किंवा सोयाबीन पिक काढल्यानंतर काही दिवसांनी शेत उभे आडवे नांगरुन घ्यावे. नंतर कुळवाने मातीची ठेकळे फोडुन घ्यावीत. ३ ते ४ पाळया देवुन माती भुसभूसीत करुन घ्यावी. कोरडवाहु पध्दतीने लागवड करण्यासाठी रब्बी हंगामात पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे.
बी पेरणीची वेळ, मात्रा व पदधत :
ऑक्टोबर महिन्रयात किंवा नोव्हेंबर महिन्याचे सुरवातीस पेरणी करतात. एक हेक्टर क्षेत्रासाठी 4 ते 5 किलो बियाने पुरेसे होते. कोरडवाहु पीक घ्यावयाचे असल्यास जुलै महिन्याचा शेवटचा आठवला किंवा ऑगष्ट महिन्याचा पहिला पंधरवाडा या दरम्यान बी शेतात पेरणी करतात.
दोन ओळीत 45 से.मी. ते 60 सें.मी. अंतर ठेवून पेरतात. बियाणे 2.5 ते 3 सें.मी. पेक्षा जास्त खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
आलिताखाली ओवा लागवडीसाठी सरी वरंबा पदधतीने (60 सें.मी. ते 75 सें.मी. अंतरावर) 3 X2 मीटर लांब रुंदीचे वाफे तयार करुन घ्यावे व त्यामंध्ये 30 सें.मी. ते 40 सें.मी. अंतरावर वरंब्याच्या मधेमध टोकुन पेरावे. ओव्याचे बी आकारमानाने व वजनाने हलके असल्यामुळे, बियाण्या इतक्याच वजनाची बारीक रेती मिसळून बियाणे पेरावे किंवा टोकावे. बियाणे जमिनीपासून
ते
खत व्यवस्थापन:
ओवा हे पिक नौसर्गीकरित्या तणासारखे जमीनीतील पाणी, अन्नद्रव्ये व इतर बाबींसाठी स्पर्धा करुन जीवनक्रम पुर्ण करते. करीता लागवडीच्या वेळेस ते 10 ते 15 टन कुजलेले सेंद्रिय खत मिसळून दयावे.
रसायनीक खते दयायची झाल्यास हेक्टरी 50 किलो नत्र व 25 किलो स्फुरद दयावे. लागवडीच्या वेळी पुर्ण स्फुरद व अर्धे नत्र व उर्वरीत नत्र हे लागवडीनंतर 30 दिवसांनी दयावे. खते उदा 1. हेक्टरी 1 बॅग डी.ए.पी व 2 बॅग युरीया. उदा 2 – एस.एस.पी. 3 बॅग व युरीया 2 बॅग.
तण व्यवस्थापन व इतर मशागत :
पेणी आटोपल्यानंतर 03 दिवसांच्या आत पेंडामिथीलीनीन 1.25 किलो उपलब्ध घटक प्रति हेक्टरी फवारणी करावी. म्हणजे पुढील 40 ते 50 दिवस होणारा तणांचा संभाव्य त्रास कमी होण्यास मदत होते. ओव्याच्या अधीक उत्पादनासाठी दोन ते तीन निंदणी आणि एक डवरणी अधिक फायदेशीर ठरते. पहिले निंदणाची वेळ ही लागवडीपासून 30 दिवसांनी करावी. तसेच सपाट वाफयामंध्ये एका ठिकाणी ओव्याची दोन किंवा तीनच झाडे ठेवून बाकीचे झाडांची विरळणी करणे सुदधा आवश्यक आहे. यानंतरच्या पाळया साधारणपणे एक महिना एवढया अंतराने दिल्यास तणंची स्पर्धा कमी हाउन उत्पादन वाढण्यास मदत मिळते.
तण व्यवस्थापन व इतर मशागत :
पेणी आटोपल्यानंतर 03 दिवसांच्या आत पेंडामिथीलीनीन 1.25 किलो उपलब्ध घटक प्रति हेक्टरी फवारणी करावी. म्हणजे पुढील 40 ते 50 दिवस होणारा तणांचा संभाव्य त्रास कमी होण्यास मदत होते. ओव्याच्या अधीक उत्पादनासाठी दोन ते तीन निंदणी आणि एक डवरणी अधिक फायदेशीर ठरते. पहिले निंदणाची वेळ ही लागवडीपासून 30 दिवसांनी करावी. तसेच सपाट वाफयामंध्ये एका ठिकाणी ओव्याची दोन किंवा तीनच झाडे ठेवून बाकीचे झाडांची विरळणी करणे सुदधा आवश्यक आहे. यानंतरच्या पाळया साधारणपणे एक महिना एवढया अंतराने दिल्यास तणंची स्पर्धा कमी हाउन उत्पादन वाढण्यास मदत मिळते.
पाणी व्यवस्थापन :
ओवा पिकास त्याच्या जिवनचक्रामंध्ये साधाारणपणे 4 ते 5 ओलीताची गरज असेते. परंतु कोरडवाहु पीक पदधतीत जमीनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याच्या पाळया संख्येत बदल करता येउ शकत नसला तरीही पीक फुलोरावस्थेत असतांना, म्हणजेच लागवडीपासून 70 ते 85 दिवसांपर्यंत एक संरक्षित ओलित दिल्यास उत्पादन वाढण्यास मदत मिळते.
काढणी:
साधारणपणे 160 ते 180 दिवस एवढया कालावधीत पिक तयार होते. रब्बी लागवड मंध्ये मार्च च्या शेवटच्या आठवडयामंध्ये तयार होते. फुलांचा किंवा बोंडांचा रंग तपकिरी होण्यास सुरवात झाली की बिया तयार झाल्या असे समजावे. जमीनीपासून 15 ते 20 सें.मी. अंतर ठेवून झाडे कापावी व त्यांच्या पेढया बाधाव्यात. खळयात नेउन पुर्ण सुकल्यानंतर लाकडी काठीने बदडून बी वेगळे करून घ्यावे व स्वच्छ करून भरुन ठेवावे.
उत्पादन :
उपरोक्त काळजी घेवून शास्त्रीय पदधतीने ओव्याची शेती केल्यास ओलीत व्यवस्थापनाअंतर्गत हेक्टरी 10 ते 15 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न विदर्भाच्या व मराठवाडयाच्या हवामानात अपेक्षीत आहे.
किड व रोग व्यवस्थापन:
मावा : ही किड ओव्याचे नाजुक व रसदार भाग उदा. पाने, फुले, कावळी शेंडे यातील रस शोषण करतात त्यामुळे पाने पिवळी पडतात, वाळतात आणि बियांचा आकार लहान राहतो. याचे नियंत्रनासाठी डायमेथोएट 30 इ. सी. , 10 मि.ली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
रोग व्यवस्थापन:
भुरी रोग:
सुरवातीस पानांच्या वरच्या बाजूस राहून पांढऱ्या रंगाच्या बुरशीची वाढ होते. कालांतराने पुर्ण झाड पांढरे होवून वाढ खुंटते व वाळून जाते. नियंत्रणासाठी गंधकाची भुकटी 20 ते 25 किलो हेक्टरी धुरळुन घ्यावी किंवा कॅरेथॉन हे ऑषध 0.05 टक्के तीव्रतेचे फवारुन घ्यावे.
सध्या विदर्भामंध्ये लागवड होते तसेच मराठवाडा येथील जालना जिल्हयामंध्ये ओवा पिकांची लागवड करण्यात येत आहे. काही क्षेत्रावर शेतकरी बाधवांनी नक्कीच प्रयोग करण्यास हारकत नाही.
संदर्भ : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विदयापिठ येथील तज्ञ लेख.