mulberry cultivation to silkwork rearing and sale complete information and updations.

रेशीम उद्योग-तुती लागवड

तुती बेणे तयार करणे:तुती लागवड तुतीबेण्या पासून करायची असते. त्यासाठी एम-5, एस-54, एस-36, व्ही -1 अशा सुधारीत जातीची बेणे वापरावीत. बेणे तयार करतांना 6 ते 8 महिने वयाच्या तुती झाडांची 10 ते 12 मि.मि. जाडीच्या फांद्या निवडण्यात याव्यात व बेण्याची लांबी 6 ते 8 इंच असावी. त्यावर किमान 3 ते 4 डोळे असावेत व तुकडे करातांना धारदार कोयत्याने तुकडे करावेत कोवळया फांद्या बेणे तयार करण्यासाठी वापरु नयेत. तुती बेण्यावरील रासायनीक प्रक्रिया: तुती कलमे तयार केल्यानंतर जमीनतली वाळवी/ उधळी, बुराशी रोगापासून बेण्याचे नुकसान होऊ नये यासाठी खालील प्रमाणे बेण्यावर रासायनिक प्रकिया…

Continue Readingरेशीम उद्योग-तुती लागवड

रेशीम उद्योग-किटक संगोपन

रेशीम उद्योग-किटक संगोपन अंडी, अळी, कोष, पतंग, हे रेशीम किटकाचे जीवनचक्र आहे. यातील कोष, पतंग, अंडी या रेशीम अंडीपुंज निर्मितीच्या आवश्यक अवस्था आहे. अंडी, अळी, कोष या रेशीमअळी संगोपनाच्या आवश्यक अवस्था आहेत. रेशीम अळयांचे आयुष्य सर्वसामान्यपणे 28 दिवसांचे असून ते पाच अळी वाढीच्या अवस्था व चार कात टाकण्याच्या (सुप्तावस्था) यात विभागते. यापैकी रेशीम अंडीपुंजांतून रेशीम अळया बाहेर पडण्यापासून रेशीम अळयांच्या पहिल्या दोन वाढीच्या अवस्था व पहिल्या दोन कात टाकण्याच्या अवस्था या रेशीम बालअळी संगोपनात मोडतात तर पुढील तीन वाढीच्या अवस्था व दोन सुप्तावस्था या प्रौढ अळी संगोपनात येतात. आता आपण…

Continue Readingरेशीम उद्योग-किटक संगोपन