पेरणीची वेळ
रब्बी ज्वारीची पेरणी मुख्यत्वे खरिपातील किंवा सप्टेंबर महिन्यातील पडलेल्या पावसाच्या ओलीवर केली जाते. कोरडवाहू रब्बी ज्वारीची पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत करावी, तर रब्बी बागायती ज्वारीची पेरणी 31 ऑक्टोबरपर्यंत करावी. उशिरा पेरणी केल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव अधिक होतो. त्यामुळे वेळेवर पेरणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
बियाण्याचे प्रमाण
रब्बी ज्वारीच्या पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. बियाणे खरेदी करताना बियाणाची उगवणूकक्षमता तसेच त्याची आनुवंशिक शुद्धता पाहूनच त्या बियाणाची खरेदी करावी.
बीजप्रक्रिया
ज्वारी पिकाच्या विविध रोगांपासून संरक्षण करण्यासाठी बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे. यासाठी पेरणीपूर्व बियाणास गंधक 4 ग्रॅम अथवा कार्बेन्डॅझिम 1.5 ग्रॅम+थायरम 1.5 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे लावावे.
जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया
पेरणीपूर्वी ज्वारीच्या बियाणास जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. यासाठी अझोस्पिरिलियम किंवा अझोटोबॅक्टर व पी. एस.बी. प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति 1 किलो बियाणे याप्रमाणे लावावे. हे जिवाणू संवर्धक सध्या द्रवस्वरूपातदेखील उपलब्ध आहेत. यासाठी अझोटोबॅक्टर किंवा अझोस्पिरिलियम व पी.एस.बी प्रत्येकी 8 मि.लि. प्रती 1 किलो बियाणे याप्रमाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. या जिवाणू संवर्धकाच्या बीजप्रक्रियेमुळे उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ होते.
पेरणीची पद्धत
पेरणी तिफणीने किंवा दोन चाड्यांच्या पाभरीने करावी. दोन ओळींतील अंतर 45 सें.मी. व दोन रोपांतील अंतर 15 सें.मी. ठेवावे. बी ओल्यात पडेल याची काळजी घेऊन 4 सें.मी.पेक्षा जास्त खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी.
रासायनिक तण व्यवस्थापन
अट्राझीन 50 डब्ल्यू पी. 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून पीक पेरणीनंतर परंतु बियाणे उगवणीपूर्वी फवारणी करावी.
पेरणीनंतर 20-25 दिवसांनी 2-4 डी 80 डब्ल्यू. पी. 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
रासायनिक खतांचा वापर
रब्बी ज्वारीच्या संकरित व सुधारित जाती नत्र खतास चांगला प्रतिसाद देतात. जमिनीच्या प्रकारानुसार पुढील प्रकारे खते वापरावीत-
प्रति हेक्टरी खताचे प्रमाण (कि/ग्रॅ/हेक्टर) . कोरडवाहु मध्यम जमीनीसाठी 40 किलो नत्र 20 स्फुरद
पर्याय सर्व किलो मंध्ये खते: (1)युरीया 90: एस एस पी : 125, (2) डीएपी -50, युरीया -70
बायागायती साठी 80 : 40:40 नत्र: स्फुरद: पालाश
पर्याय सर्व किलो मंध्ये खते: (1)युरीया 175: एस एस पी : 250: मुरेट ऑफ पोटॅश-67, (2) डीएपी -87, युरीया -87 (3) 20:20:0 – 200, युरीया -87
…………………………………………………..
सर्व पिकांची माहीती | शेती संदेश | शेती योजना सोबतच शेती संमंधी सर्व वस्तुंचे शेतकऱ्यांचे उत्पादने online विक्री साठी खालील लिंक व्दारे ॲप download करा अथवा. सातत्याने https://ShetiSeva.Com वेबसाईल ला भेट दयावी.
शेतीसेवा
खालिल लिंक व्दारे शेती सेवा 2.1 मोबाईल ॲप download करु शकता
https://play.google.com/store/apps/details?id=com.wShetiSeva_11999176
