सोयाबीनवरील शेंगा करपा रोगाचे व्यवस्थापन

असे करा सोयाबीनवरील शेंगा करपा रोगाचे व्यवस्थापन

सततच्या पावसामुळे सोयाबीनवर शेंगा करपा हा रोग काही भागात दिसून येत आहे व इतरही भागात येण्याची शक्यता आहे तरी भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी त्याचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

लक्षणे व नुकसान:
हा रोग Collototrichum truncatum हया बुरशीमुळे होतो पाने, खोड व शेंगांवर अनियमित आकाराचे भुरकट, लालसर किंवा गर्द तपकिरी रंगाचे ठिपके पडतात व त्यावर नंतर काळी सूक्ष्म बुरशीपुंज दिसून येतात. शेंगांचा आकार लहान व पोचट राहतो व त्याचा बी तयार होण्यावर विपरीत परिणाम होतो.

व्यवस्थापन:
रोग नियंत्रणासाठी व conidia द्वारें इतर निरोगी सोयाबीन वर पसरू नये म्हणून कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) – ५०० ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १०%+ सल्फर ६५ % (संयुक्त बुरशीनाशक) – ५०० ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल २५.९ % – २५० मिली प्रति एकर फवारावे.

आवश्यकता वाटल्यास दहा दिवसांनी परत एकदा फवारणी करावी.

वरील प्रमाण सर्व प्रकारच्या पंपाकरिता आहे

अधिक माहितीसाठी संपर्क करा
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
परभणी
☎ ०२४५२-२२९०००